धुळे : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शासकीय विद्यानिकेतन, धुळे विद्यालयात भक्तीमय वातावरणात वृक्षदिंडी आणि ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीला विद्यालयाच्या मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून सुरुवात करण्यात आली. दिंडीच्या मार्गावर महानगरपालिकेसमोर विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयक पथनाट्य व गीत सादर केले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि शाळेतील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अधिव्याख्याता जयप्रकाश पाटील होते, त्यांनी आपल्या मनोगतात ग्रंथ व पुस्तकांचे वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आवश्यक आहे, सध्या मोबाईलच्या अतिरेकामुळे वाचन संस्कृती कमी झाली आहे, त्यामुळे वाचनाशिवाय पर्याय नाही. जैवविविधता व्यवस्थापन करण्यात वृक्ष लागवड व संवर्धन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाबद्दल कुलप्रमुख प्रतिभा ठाकूर यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती आणि वाचन संस्कृती जोपासण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने वृक्षदिंडी आणि ग्रंथदिंडीद्वारे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन समाजात सकारात्मक संदेश दिला आहे.” शेवटी, सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन हरित आणि ज्ञानमय समाज घडविण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाच्या समन्वयक शिक्षिका वनिता पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.
या कार्यक्रमास शाळेच्या प्राचार्य डॉ. मंजुषा क्षीरसागर, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. जयप्रकाश पाटील, कुलप्रमुख प्रतिभा ठाकूर, गृहप्रमुख प्रतिभा मेश्राम, सहाय्यक गृहप्रमुख प्रशांत वडनेरे, माधुरी महाले, उपशिक्षिका वनिता पाटील, सुनील देसले, विनोद रोकडे, नेहा साळुंखे, नुपेश वंजारी, सुषमा झोळे, सुनिता डंबाळे, सुरेश बच्छाव, योगिता बैसाणे, सुवर्णा मोहिते,चेतन भामरे, शितल करडक, प्रकाश पवार, कुणाल दामोदर,भावना सोनवणे यांच्यासह अनेक विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
धुळे येथील शासकीय विद्यानिकेतनात आषाढी एकादशीनिमित्त वृक्षदिंडीसह ग्रंथदिंडीचे आयोजन.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


