सावंतवाडी : भाजपाचे युवा नेते संदीप गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळी सावंतवाडी नगरपरिषदेत सफाई कामगारांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, सातत्याने विधायक कार्य करणारे युवा नेते संदीप गावडे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सफाई कर्मचारी बांधवांनी विशेष कौतुक करीत त्यांचे आभार मानले.

यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी, दीपक म्हापसेकर, भाई राणे यांनी तसेच सर्व सफाई कर्मचारी यांनी युवा नेते संदीप गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या.


