सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे बुधवार दि. 13 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लेफ्टनंट कर्नल, हीज हायनेस, श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांची 98 वी जयंती ‘संस्थापक दिन’ म्हणून साजरी करण्यात येणार आहे .या समारंभाचे अध्यक्ष स्थान राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,अध्यक्ष , सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ हे भूषविणार आहेत . कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर चे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे हे उपस्थित राहणार आहेत. ते ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील संधी’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमास आपण अगत्यपूर्वक उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांनी केले आहे.
‘एसपीके’ महाविद्यालयात उद्या ‘संस्थापक दिन’ होणार साजरा. ; श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांना जयंतीनिमित्त करण्यात येणार अभिवादन !
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


