​शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीच्या अध्यक्षपदी युवा नेते विक्रांत सावंत यांची बिनविरोध निवड!

सावंतवाडी : सावंतवाडीतील शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या अध्यक्षपदी विक्रांत विकास सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. राणी पार्वती देवी हायस्कूल च्या शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची कार्यकारणी बैठक आज संस्थेच्या कार्यालयात घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष विकास सावंत यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे सुपुत्र असलेले विक्रांत सावंत यांचे अध्यक्षपदी निवड आज कार्यकारिणीने जाहीर केली.

यावेळी उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, सदस्य अमोल सावंत, चंद्रकांत सावंत, संदीप राणे, प्रा. सतीश बागवे, वसुधा मुळीक. छाया सावंत, स्नेहा परब आदी उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली.

अध्यक्षपदी विक्रांत सावंत यांची निवड जाहीर होताच संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. आपण सर्वांना एकत्र घेऊन काम करणार असल्याचे श्री. सावंत यांनी स्पष्ट केले. युवा नेते विक्रांत सावंत यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles