नगराध्यक्ष आमचा असावा, महायुतीच्या बैठकीत ‘हा’ विषय मांडणार! ; माजी मंत्री आ. दीपक केसरकर यांनी ठोकला दावा.

सावंतवाडी : आगामी सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने नगराध्यक्ष पदावर दावा केला आहे. आमचा नगराध्यक्ष असावा अशी आमची भूमिका आहे. महायुतीच्या बैठकीत हा विषय मांडणार असून महायुतीतून पद सेनेला सोडावं अशी मागणी करणार असल्याचे माजी मंत्री , आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.

आम. केसरकर म्हणाले, सावंतवाडी ही एकमेव नगरपरिषद आहे जिथे आरक्षण नसतानाही महिला नगराध्यक्षा राहिलेल्या आहेत. शिवसेनेत अनेक सक्षम उमेदवार असून महायुतीमध्ये जागावाटपाची बोलणी सुरू आहे. माजी नगराध्यक्ष संजू परब हे शिवसेनेसोबत आहेत. तसेच गेली अनेक वर्षे सावंतवाडी शहराचा पाठिंबा आम्हाला राहिला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पद शिवसेनेकडेच राहावे, अशी मागणी महायुतीच्या बैठकीत करणार असल्याचे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब उपस्थित होते. महायुतीतून शिवसेनेला नगराध्यक्ष पद सोडावे अशी भूमिका केसरकर यांची असल्याने आता महायुतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी काय निर्णय घेतला जातो ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles