हेमराज बागुल दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संचालकपदी रुजू!

नवी दिल्ली : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संचालकपदाचा कार्यभार संचालक हेमराज बागुल यांनी नुकताच स्वीकारला.

महाराष्ट्र शासनाच्या नवी दिल्लीतील निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती आर विमला यांनी श्री. बागुल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनिषा पिंगळे यावेळी उपस्थित होत्या.

श्री. बागुल महासंचालनालयातील ज्येष्ठ संचालक असून ते मंत्रालयातील मुख्यालयात संचालक (प्रशासन) या पदावर कार्यरत होते. त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी तसेच महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभाग आणि छत्रपती संभाजीनगर -लातूर विभागाच्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

शासकीय सेवेत येण्यापूर्वी श्री. बागुल यांनी पत्रकारितेत उल्लेखनीय योगदान दिले आहे. तसेच साहित्यविषयक विविध प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनीही श्री. बागुल यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles