सावंतवाडी : आज सायंकाळी साडेचार वाजता आरोपी तौसीफ ताजुद्दीन सौदागर (वय 38, राहणार – मंगळवार पेठ कोल्हापूर) हा विविध ब्रँडची गोवा बनावटीची सुमारे २६,०००/- रुपये किमतीच्या ३० बाटल्या दारू ट्रॅव्हल बॅगमधून नेताना माजगाव गरड या ठिकाणी मिळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई गोपनीय बातमीच्या आधारे पोलीस हवालदार श्री. वालावलकर, महेश जाधव, अनिल धुरी, संजय कोरगावकर यांच्या पथकाने गरड नाका येथे आज सायंकाळी साडेचार वाजता केली आहे.
गोवा बनावटीची दारू नेताना कोल्हापूर येथील युवकास माजगाव गरड येथे अटक. ; सावंतवाडी पोलिसांची कारवाई!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


