सावंतवाडी : श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित कोकणातील पहिल्या सैनिक स्कूलच्या रूपाने उभारण्यात येत असलेल्या भोसले सैनिक स्कूल (यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल)च्या भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळ्याचा भव्यदिव्य कार्यक्रम उद्या शनिवार, दि. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा ऐतिहासिक सोहळा भोसले नॉलेज सिटी, चराठे (वझरवाडी), ता. सावंतवाडी येथे पार पडणार आहे.
संरक्षण मंत्रालय, भारत सरकार व सैनिक स्कूल सोसायटी मान्यता प्राप्त असलेल्या या शैक्षणिक प्रकल्पामुळे कोकणातील विद्यार्थ्यांसाठी सैनिक प्रशिक्षणासह दर्जेदार शिक्षणाची नवी दारे खुली होत आहेत.
या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, डॉ. अरविंद कुडतरकर (मा. जिल्हा संघ चालक (रा. स्व.संघ) सिंधुदुर्ग, नीरज चौधरकर – प्रांत संघटन मंत्री (अ.भा. वि. प. कोकण, ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर (उपाध्यक्ष – अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद), मेजर विनय देगावकर (अध्यक्ष – अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद, कोकण प्रांत) आदि मान्यवर उपस्थित राहणार असून या निमित्ताने सर्व नागरिक, विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्यास साक्षीदार व्हावे आणी सैनिक सुसंस्कारांच्या नव्या पर्वाची सुरुवात करूया, असे आवाहन आयोजक तथा निमंत्रक कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ॲड. सौ अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई यांनी केले आहे




