सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक प्रचारार्थ आज प्रभाग ७ मध्ये शिवसेना शिंदे गटाची प्रचार सभा संपन्न होत असून या प्रचार सभेत माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांनी दणदणीत भाषण केले. श्री. वारंग पुढे म्हणाले की, आपली सावंतवाडी जर टिकवायची असेल तर आमदार दीपक केसरकर यांच्या पाठीशी जनतेने उभे राहायला हवं. कारण आ. दीपक केसरकर ,संजू परब यांना तुम्ही कधीही भेटू शकता, पण काही लोक हे निवडणुकीपुरते तुमच्या दारात येतील,त्यानंतर ते तुम्हाला परत दिसणार पण नाहीत. त्यामुळे जनतेने याचा विचार करावा. आपल्या सावंतवाडीच नाव जर राज्यात कोणी पोहोचवलं तर ते आमदार दीपक केसरकरच आहेत. येत्या दोन तारखेला आमच्या सर्व उमेदवारांना जनतेने भरघोस मतदान करून निवडून द्यावे, असे आवाहन देखील उमाकांत वारंग यांनी केलं.
यावेळी व्यासपीठावर आ. दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजू परब यांसह शिवसेनेचे सर्व उमेदवार, पदाधिकारी उपस्थित होते.


