– सामाजिक कार्यकर्ते अमित वेंगुर्लेकर यांचा राज्यकर्त्यांना अंतर्मुख करणारा सवाल.
सावंतवाडी : निवडणूक!, पक्षीय राजकारण!, आणि आम्ही दिवसेंदिवस कायद्याच्या चौकटीत राहून अवैध्य कृत्य उघड्या डोळांनी बघणारी जनता?
आमचा सच्चा समाजसुधारक नक्की कोण?
न्याय व्यवस्था की भरकटत चाललेलं हे पैशांच्या जोरावरच राजकारण!
अमित वेंगुर्लेकर याचा लोकशाहीला जागा करणारा सूचक प्रश्न?
जन्माला येताना जन्म दाखला जरुरीचा, शिक्षण घेताना डोनेशन महत्वाचं,नोकरीच्या वेळेस लाखांच्या तुलनेत रक्कम द्या!, प्रमोशनसाठी लाचारी करत पैसे मोजून चाकरी करा!, एखादा दिवस सुट्टी हवी असेल तर मात्र शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करा?
मग फक्त राजकीय क्षेत्रातील वैभवशाली वाटचालीस असलेले पदाधिकारी यांनाच या सर्व नियम आणि अटी का लागू होत नाहीत?
ग्रामपंचायत पडून हायकोर्ट यांच्याच नियमांची अंमलबजावणी करत आहे असे या दैनंदिन जीवनातील मिनिटामिटातील घडामोडींवरून निदर्शनास येत आहे.
इथे सर्वसामान्य माणूस सध्या मुबलक सुविधांसाठी लढतोय ओ?????
आम्ही सर्वजण मासिक रेशन दुकाने म्हणजेच धान्य मिळव म्हणून त्या त्या वॉर्डांत जीवाची सर्कस करत आहोत? रोज सकाळी साडेपाच वाजता उठून कधी नळाला पाणी सोडणार? याची वाट बघावी लागत आहे! दिवसभरात विद्युत पुरवठा आमच्या आयुष्याशी लपंडाव खेळत आहे; अती वृष्टीमुळे केलेले पंचनामे हवेतच असतात, शासकीय कार्यालयात कुठे एखादा दस्तावेज करावयास गेलो तर तिथे मांडवली शिवाय कामं होत नाहीत आमच्या कुटुंबातील एखादा आजारपणाचा प्रश्न उपस्थित झाला तर इथले सरकारी रुग्णालय फक्त तापाच्या किंवा सर्दीच्या लाल औषधापेक्षा इतर आजारांवर प्रतिबंधक उपाययोजना करण्यास सक्षम नाही गावागावात या पेक्षा भयानक समस्या आहेत आणि तुम्ही सर्व पक्षीय राजकीय क्षेत्रातील वैभवशाली नेतेमंडळी आम्हा कोकणवासीयाच्या सुखसुविधांसाठी करोडो रुपयांची निधी सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचे आकडे आणि उद्घाटन करण्यात मग्न आहात आता नगरपिका निवडणूक आली आहे तुम्ही खरं सांगाव सर्वपक्षीय नेत्यांनी की तुम्ही आज पर्यंत तुमच्या नेमणुकीतील कार्यकारणी सोडून खरंच गोरगरीमसंपायंत पोचता का?
कोण सांगत मताला पैसे देतात,कोण सांगत फक्त सभेत हजर राहील तर पाचशे रुपये देतात मग तुम्ही निवडणुका का घेता जर तुमचं तुम्ही सर्व विकत घेऊन करता तर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप का करता ?
अस तर नाही ना की आम्ही सर्वसामान्य माणूस यात विचार करत रहाव आणि तुम्ही मग एका बैठकीत बसून फक्त निधींच्या तारखा देणार?
आता कोणीतरी बोललच पाहिजे कारण जिल्यातील गावागावात पूर्वीचे रस्ते सुद्धा अरुंद होत चाललेत जागा भव्य इमारतींच्या एफ एस आय साठी वापरताय आज या जिल्यातील मोजक्याच रहिवासी किंवा वाणिज्य इमारती असतीतल ज्यांना कॉम्प्लिशन ऑर्डर नियमांच्या चौकटीत आहे.
अहो गरिबाला घर बांधताना किंवा वाट घेताना सतराशे साठ नियम आणि आज साधा ग्रामपंचायत सदस्य झाला की त्याच्याकडं अचानक धनसंपदा मग हे गौडबंगाल कोण करतं?
आम्ही नियमित शासकीय पायरीच्या टोकावर अधांतरी राहणारी जनताच ना; खरं सांगा राजकीय वर्तुळात तुम्ही ज्या आर्थिक सुखसुविधा लाभार्थी आहात त्या पेक्षा आम्ही जागृत मतदार म्हणताय ना तुम्ही मगं आमची रोजच्या जीवनातील हेडसाळ म्हणजेच तुम्हाला मतदान, असाच विषय झाला आहे” आणि त्यात जर कोणी सामाजिक संस्थेमार्फत एखाद्या गरजुला मदत करेल तर मी अमुकांचा पी ए त्यांनी मला पाठवलं आहे असं सांगत अचानक घरात घुसू सोबत महिला ज्या इतर गुन्ह्यात सहभागी आहेत अशा व्यक्तींना घेऊन गोरगरीब जनतेला निस्वार्थी मदत करण्यासाठी धडपडणाऱ्या सामाजिक सेवकांना धमकावल जात आणि पोलिस प्रशासनही त्या राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी यांचं नाव नाईलाजास्तव सामाजिक न्याय देणाऱ्या व्यक्तीवर अन्याय करतात मग कुठे जिवंत राहिली सर्वसामान्य माणसांची प्रमाणिक मते इथे जोर जबरदस्तीने स्थानिक जनतेला विश्वासात न घेता सुरू असली हुकूमशाही जो पर्यंत जैसे थे होत नाही तोपर्यंत कोणतीही सर्वसामान्य जनतेची कामे होणार नाहीत मग ती नोकरी असो, दळण वळण असो,आरोग्य सुविधा असो किंवा आत्मसुरक्षा असो
जोपर्यंत पक्षीय नेतेमंडळी हुकूमसहीचे राजकारण करत राहणार तो पर्यंत संबंधित जनता या मुलभून सुविधां पासून वंचितच राहणार आहे त्यामुळे माझी सर्वपक्षीय निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवारास नम्र विनंती आहे की सर्वसामान्य जनतेचे विचार विनिमय कायद्याच्या चौकटीत राहून जाणून घ्या विचार करावयास लागा आपसात पुट नसावी हे ध्यानात वागवा आणि आमच्या बहुमूल्य अशा मतदानाला पुढील पाच वर्षाच्या प्रत्येक दिवसाला येणाऱ्या समस्या जाणून घेऊन योग्य न्याय द्या म्हणजे पुढच्या वेळेस पक्ष नव्हे तर सरसामंय जनतेच्या हितासाठी झटणारा लोकप्रतिनिधी म्हणून हा तुम्हाला मतदान झालं पाहिजे असे उदगार सामाजिक कार्यकर्ते तथा मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठनेतर्फे श्री.अमित वेंगुर्लेकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून कळविले आहे .


