‘ते’ जिल्ह्यात मटक्याचा विकास करणार काय? ; शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परबांची परखड टीका.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मटका बंद करुन पालकमंत्र्यांनी मटक्यावाल्यानाचं भाजपची तिकीट दिली, ज्यांच्यावर मालवणमध्ये गुन्हा दाखल आहे, अशा व्यक्ती त्यांना चालतात कसे?, अशी परखड टीका शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांनी नाव न घेता केली आहे.

दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मटक्यावाल्यांना तिकीट देऊन मटक्याचा विकास करणार का? असा देखील सवाल संजू परब यांनी उपस्थित केलाय.

सावंतवाडीचा विकास हे फक्त आमदार दीपक केसरकरच करू शकतात. विशाल परब यांचे कार्यकर्ते त्यांच्याच पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारा विरोधात माझ्याच प्रभागात अपप्रचार सुरू केला असून जर तुम्ही भाजपा उमेदवाराला मतं घातली तर ते उद्या आमदारकीचे दावेदार होऊ शकतात,त्यामुळे तुम्ही त्यांना मत घालू नका विशाल साहेबांची आमदारकी धोक्यात येईल, अशा पद्धतीने अपप्रचार सुरू असल्यामुळे सावंतवाडीच्या जनतेने आता ह्यांना ओळखावं, हे आपसातच एकमेकांना निवडणुकीत पाडण्याची स्पर्धा सुरू केल्याने यांचं भवितव्य काय असू शकते?, हे जनतेने ओळखावे असे सांगत आता संजू परब यांचा पराभव करणे कोणालाही शक्य नाही, असेही संजू परब यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles