सावंतवाडी : मतदान हे संविधानाने दिलेले पवित्र दान आहे. त्याचा हक्क सर्वांनी बजवावा आणि लोकशाहीला बळकट करावे, असे आवाहन सावंतवाडी येथील राजघराण्याकडून करण्यात आले.


सावंतवाडी येथील शाळा क्रमांक चार येथे राजघराण्याने आपला पवित्र मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदारांना आवाहन केले.

दरम्यान स्वतः राजेसाहेब खेमसावंत भोंसले तसेच राणी शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोंसले, राजकन्या उर्वशीराजे भोंसले यांनी सामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभे राहून अत्यंत शिस्तबद्ध मतदान केले. तसेच त्यांनी यावेळी मतदारांनाही मतदान करण्याचे व लोकशाहीला बळकटी आणण्याचे आवाहन केले.


