विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, ७० हून अधिक जागांवर दावा ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं ठरलं.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून महायुतीमध्ये 70 पेक्षा जास्त जागांवर दावा केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच विद्यमान आमदारांपैकी कोणाचेही तिकीट कापले जाणार नसल्याची हमीही अजित पवारांनी दिली असल्याची माहिती आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची एक बैठक पार पडली. त्यामध्ये जागावाटपावर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.

विद्यमान आमदारांपैकी कोणाचेही तिकीट कापले जाणार नाही अशी बैठकीत हमी देण्यात आली. 2019 साली राष्ट्रवादीचे 54 आमदार निवडून आले होते. त्यात आणखी 15 जागांची मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून केली जाणार आहे.

राज्यातील 70 पेक्षा जास्त जागांवर दावा –

या आधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून राज्यातील 80 जागांवर दावा करण्याची तयारी होती. मात्र आमदारांसोबत झालेल्या बैठकीत फक्त 15 जागा वाढवून मागण्यांची रननीती आखण्यात आली आहे. त्यामुळे आता 70 पेक्षा जास्त जागांवर दावा करण्यात येणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles