दोडामार्ग: तालुक्यातील कोलझर येथे विराजमान असलेल्या श्री देवी माऊली यांच्या वार्षिक जत्रोत्सवानिमित्त भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यउद्या मंगळवार, दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी हा जत्रोत्सव भक्तिभावाने साजरा होणार असून, यानिमित्ताने परिसरातील तसेच दूरदूरहून येणाऱ्या सर्व भाविकांचे स्वागत करण्यात येणार आहे.
या पावन प्रसंगी देवी माऊलीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. जत्रोत्सवानिमित्त धार्मिक विधी, पूजा-अर्चा व दर्शनाचा कार्यक्रम दिवसभर सुरू राहणार आहे. तसेच येणाऱ्या नूतन वर्ष २०२६ च्या पार्श्वभूमीवर भाविकांना देवी माऊलीकडून सुख, समृद्धी व आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना करण्यात येणार आहे.
या जत्रोत्सवानिमित्त देवस्थान कमिटी कोलझर व कोलझर ग्रामस्थ यांच्या वतीने सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवी माऊलीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


