संजू परबांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल सुदन कवठणकरांनी केले विशेष हार्दिक अभिनंदन!

सावंतवाडी : येथील नगरपरिषद निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागलेल्या प्रभाग क्रमांक ७ मधील विजयी उमेदवार संजू परब यांचे शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते सुदन कवठणकर यांनी भेट घेऊन हार्दिक अभिनंदन केले. संजू परब यांना निवडणुकीत हरविण्यासाठी विरोधकांनी जीवाचं रान केलं. मात्र तरी देखील संजू परब प्रचंड बहुमतांनी निवडून आले. भल्याभल्यांनी संजू परब यांना निवडणुकीत पाडण्यासाठी कंबर कसली होती, मात्र ते सर्व अपयशी ठरले. याउलट संजू परब हे सर्वाधिक मतांनी निवडून येत त्यांनी इतिहास घडविला. याबद्दल त्यांचे निकटवर्तीय स्नेही सुदन कवठणकर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक अजय गोंदावळे हे देखील उपस्थित होते. त्यांचेही श्री. कवठणकर यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles