नवनिर्वाचित नगरसेविका ॲड. सायली दुभाषी यांनी घेतले माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले यांचे आशीर्वाद!

सावंतवाडी : येथील शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका ॲड. सायली दुभाषी यांनी आपले राजकीय गुरू राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते तसेच राज्याचे माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार प्रवीण भोंसले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

दरम्यान माजी राज्यमंत्री श्री. भोंसले यांनी सौ. सायली दुभाषी यांना आपण आपले दिवंगत सासरे व माजी नगरसेवक सतीश दुभाषी यांच्या कार्याप्रमाणेच जनसेवा करावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार प्रवीण भोसले यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती अनुराधा भोंसले व सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ दुभाषी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles