वेंगुर्ला : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा खानोली – नाईकवाडी प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ २०२५ – २६ आज मंगळवार दिनांक ३० डिसेंबर रोजी प्रशालेच्या भव्य पटांगणावर आयोजित केला आहे.
हा कार्यक्रम शिक्षणप्रेमी संजय पिळणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी,उद्योजक विजय नाईक, वायंगणी सरपंच दत्ताराम दूतोंडकर,केंद्रप्रमुख महादेव आव्हाड आदी अतिथी प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी उपस्थीत राहणार आहेत.
या निमित्ताने प्राशालेत सकाळी सत्यनारायण महापूजा,महाप्रसाद, संध्याकाळी हळदीकुंकू कार्यक्रम तर सायंकाळी ६.०० वाजता उपस्थित मान्यवरांचा सन्मान,विद्यार्थी गुणगौरव व पारितोषिक वितरण, त्यानंतर ६.३० वाजता प्रशालेच्या भव्य पटांगणाचे उदघाटन होणार आहे.तर सायंकाळी ७.०० वाजता विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
तरी परिसरातील सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी,पालक,हितचिंतक व शिक्षणप्रेमींनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करावे,असे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात येत आहे.



