टीजेएसबी बँक परिवारातर्फे नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांचे अभिनंदन!

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भों सले यांची टी. जे. एस. बी.  बँक परिवारातर्फे भेट घेत बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर सौ. स्नेहा फडके, डेप्युटी जनरल मॅनेजर तसेच रिजनल हेड यांच्यावतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी टीजेएसबी बँक परिवारातर्फे बँकेच्या असिस्टंट जनरल मॅनेजर सौ स्नेहा फडके, डेप्युटी जनरल मॅनेजर तसेच रिजनल हेड (गोवा, कर्नाटक व सिंधुदुर्ग) चे श्री अरुण भट, सिंधुदुर्ग रिजन ऑफीस चे सिनियर मॅनेजर श्री सचिन कुलकर्णी, सिंधुदुर्ग रिजन ऑफीस चे मॅनेजर श्री नितीन मोरजकर आणि सावंतवाडी शाखेचे शाखाधिकारी श्री सुनील परब आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र सरकारने गव्हर्मेंट बिझनेस संलग्न करण्याची सुविधा टी जे एस बी या बँकेला दिली आहे. याबाबत नगराध्यक्षा सौ श्रद्धाराजे भोसले यांना सौ फडके यांच्यावतीने माहिती देण्यात आली. यावर बँकेच्या वतीने सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोंसले यांनी यावेळी बँकेचे आभार मानत बँकेला लागणारे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

(सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ श्रद्धाराजे भोसले यांचे टी जे एस बी बँकेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना असिस्टंट जनरल मॅनेजर सौ. स्नेहा फडके, अरुण भट, सचिन कुलकर्णी, नितीन मोरजकर व अन्य.)

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles