बिबट्याचा रोणापाल येथे भर वस्तीत मुक्त संचार! ; ग्रामस्थ झाले भयभीत!

सावंतवाडी : तालुक्यातील रोणापाल – तळेवाडी येथील तानाजी नवशा धर्णे यांच्या घराजवळ सायंकाळच्या सुमारास बिबट्याचा मुक्त संचार आढळून आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण रोणापाल गावात आणि पंचक्रोशीत नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. बिबट्या वारंवार दिसून येत असल्यामुळे एखाद्या नागरिकाच्या जीवास धोका असल्याची देखील भीती सामाजिक कार्यकर्ते सुदीन गावडे यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान वनविभागाला भूमिकेबद्दल देखील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील सजग नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles