सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शिवदूत अशोक दत्ताराम परब यांनी बांदा – वाफोली नवीन पुलाशेजारी इलेक्ट्रिक पोल बसविण्यासाठी वारंवार ग्रामपंचायत बांदाकडे मागणी केली होती. त्यानुसार बांदा ग्रामपंचायतकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
श्रो. परब यांच्या पाठपुराव्यामुळे सदर इलेक्ट्रिक पोलासाठी वीज वितरण कंपनीला पत्र देण्यात आले असून त्यांची ही मागणी वीज वितरण कंपनीकडून मान्य झाली आहे. लवकरच बांदा – वाफोली नवीन पुलाजवळ इलेक्ट्रिक पोल बसविण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे शिव दूत अशोक परब यांच्या मागणी यशस्वी झाल्यामुळे त्यांनी सरपंच व ग्रामपंचायत बांदा यांचे मनापासून आभार मानले आहेत.



