जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सर्वसामान्य लोकप्रतिनिधी बांधवांनी उभारलेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव जनसंपर्क कार्यालय! :  युवा उद्योजक सागर राणे. ; इन्सुली जि. प. सदस्य नितीन राऊळ, पं. स. सदस्य सदाशिव राणे यांच्या संयुक्त जनसंपर्क कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन संपन्न.

सावंतवाडी : जिल्हा परिषद सदस्य इन्सुली नितीन राऊळ व पंचायत समिती सदस्य इन्सुली सदानंद राणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन युवा उद्योजक सागर नारायण राणे व बांदा येथील युवा उद्योजक नीलू देसाई, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, व कोलगाव जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांच्या उपस्थितीत पार पडले.

 

यावेळी हे कार्यालय सर्वसामान्य जनतेच आहे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहे. यावेळी कोलगाव जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांनी सांगितलं की सर्वसामान्य घराण्यातून आलेल्या एका युवा कार्यकर्त्याला आपण जिल्हा परिषद सदस्य केलं खरोखर ही एक आनंदाची बाब आहे. ही सर्वसामान्य ज्यांना राजकारणाची ओळखही नाही अशा व्यक्तींना आपण आज जिल्हा परिषद सदस्य केलं. भविष्यात ते आमदारही होऊ शकतात, असे उद्गार त्यांनी काढले.

तसेच जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी सांगितले की, हे जनसंपर्क कार्यालय फक्त इमारत नाही तर तुमच्या समस्या अपेक्षा आणि सूचना ऐकण्यासाठी उघडे असलेले दालन आहे.  तुमच्या विश्वासाला उत्तर देण्यासाठी माझे दार नेहमी खुले आहे.  इन्सुली जिल्हा परिषद मतदार संघातील ज्या सात गावांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे.  त्यासाठी मला जनसंपर्क कार्यालयात नागरिकांसाठी विविध अर्ज, तक्रार नोंदणी केंद्र, शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन युवक महिलांच्या समस्या निवारण प्रशासनाशी संवाद अधिक जलद गतीने करण्यासाठी हे कार्यालय आहे.  यापुढे आपल्याला सरकारी कार्यालयात हेलपाटे मरावे लागणार नाही याची पुरेपूर काळजी मी व आमचे पंचायत समिती सदस्य लोकप्रतिनिधी म्हणून घेणारच आहोत. आपल्या मतदारसंघातील जे विषय आहेत ते जिल्हा परिषद सभागृहामध्ये मांडण्यासाठी मी व माझे सहकारी पंचायत समितीमध्ये लोकांच्या समस्यांचं जलद गतीने कसं निवारण होईल याचा पुरेपूर प्रयत्न करणारच आहोत.  आपले आशीर्वाद प्रेम माझ्यासोबत कायम राहू दे, हीच अपेक्षा.

यावेळी कास तंटामुक्ती अध्यक्ष श्री विठ्ठल पंडित, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, तसेच अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकी पंडित यांनी केले तर आभार प्रदर्शन कास सरपंच प्रवीण पंडित यांनी केले.  यावेळी विठ्ठल पंडित, संदीप गावडे, सुहास ठाकूर, राजू वाळके, सुधीन गावडे, नंदू नेमण, बाबल तुयेकर, विठ्ठल कळंगुटकर, निबाज खान, निलेश नाईक, रमेश मळगांवकर, श्याम पराष्टेकर, जयवंत परब, रूपाली राणे, गंधली निगुडकर, विकी पंडित, पप्पू मुळीक, आबा धुरी, रामचंद्र नाईक, ऋषल पोपकर, सतीश मोरजकर, सुरेंद्र कोठावळे, तुकाराम मोरजकर , भाई म्हाडगुत, मयुर चराटकर, आदी अनेक ग्रामस्थ सात आठ गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वेळी कार्यक्रमाचे उद्घाटन कोणत्याही राजकीय व्यक्तींकडून न होता सर्वसामान्य युवा उद्योजकाकडून जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं. यावेळी अनेक गावातील सर्व नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. अनेक नागरिकांनी असे सांगितलं की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच आपण जनतेच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी जनसंपर्क कार्यालय उभारलं.  खरोखर या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण एकमेव असे लोकप्रतिनिधी आहात की ज्यांनी जनतेच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी उचललेल पाऊल हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं भाग असेल, अशा शुभेच्छा उपस्थित नागरिकांनी दिल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles