Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

”विशालभाई, तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना.!” ; युवा नेते विशाल परब – सरपंच संतोष गावडे यांच्या प्रांजळ मैत्रीचा सोहळा ठरला पेंडूरवासियांसाठी यादगार.!

मालवण : प्रत्येक आईच्या हृदयामध्ये आणि गाईच्या नेत्रांमध्ये सामाविलेल्या अथांग करूणाने भरलेली मैत्री असावी. दुःखाच्या वाळवंटामध्ये देखील आनंदाचा पाझर आणणारी मैत्री असावी. मित्रांच्या मनातील रिक्त जागेमध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारी मैत्री असावी. ज्या व्यक्तीशी बोलताना आपण मनमोकळे पणाने बोलू शकतो, अशीच मैत्री जोपासली आहे ती भाजपा युवा नेते विशाल परब – पेंडूरचे सरपंच संतोष गावडे यांनी.

पेंडूर गावचे सरपंच संतोष गावडे यांचा वाढदिवस यंदा एका खास आणि भावनिक सोहळ्याच्या साक्षीने साजरा झाला. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा उद्योजक विशाल परब यांनी आपल्या जिवलग मित्राला दिलेल्या शुभेच्छा आणि उपस्थितीत या सोहळ्याला खास सौंदर्य प्राप्त झाले. विशाल परब यांनी स्वतः संतोष गावडे यांच्या घरी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. संतोष गावडे आणि विशाल परब यांच्या पवित्र मैत्रीचा अनमोल ठेवा, परस्परांबद्दलचा आदर आणि स्नेह यांचे प्रत्यक्ष दर्शन या प्रसंगी उपस्थितांना झाले. विशाल परब यांनी यावेळी भावनिक शब्दांत आपल्या मित्राला शुभेच्छा देताना असे म्हटले, “संतोष भाई म्हणजे जिवाभावाचा सवंगडी. प्रत्येक वेळी, प्रत्येक प्रसंगी, माझ्या एका हाकेवर सदैव उपस्थित राहणारे असे व्यक्तिमत्व आहेत. आमची ही मैत्री अजून दृढ होऊन पुढेही अशीच टिकावी.!”

यावर संतोष गावडे यांनी भावुक होऊन आपल्या मित्राचे कौतुक केले आणि आपल्या वाढदिवसाचा हा अनमोल सोहळा कधीच विसरणार नाही, असे सांगितले. “आजचा माझा वाढदिवस खूपच खास झाला. विशाल भाईंनी दिलेल्या या प्रेमळ शुभेच्छा आणि मित्रत्वाच्या भावना माझ्या हृदयात कायम राहतील. असा वाढदिवस मी यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता, आणि तो अविस्मरणीय करण्याचे श्रेय पूर्णतः विशाल भाईंना जाते,” असे संतोष गावडे यांनी सांगितले.

या प्रसंगी गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सुहास गवंढळकर, सरचिटणीस बाबली वांगणकर, पप्पू परब, मनवेल फर्नांडिस, सायमन अरबेंडा, शंकर घारे, ओबीसी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेकर, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, गणेश पडते, तसेच इतर सर्व पदाधिकारी आणि पेंडूर ग्रामस्थांनी या सोहळ्याची शोभा वाढवली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles