Wednesday, June 18, 2025

Buy now

spot_img

आजपासून नवरात्रौत्सवाला सुरूवात.! ; सावंतवाडीतील बाजारपेठ नवरात्रौत्सव मंडळाच्या नवदुर्गेचे बुधवारी रात्री वाजत गाजत आगमन.!

सावंतवाडी : आजपासून नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली असून शहरातील बाजारपेठ नवरात्रौत्सव मंडळाच्या नवदुर्गेचे बुधवारी रात्री वाजत गाजत आगमन झाले. यंदा या मंडळाचे ३४ वे वर्ष असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पहिलं सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ आहे‌. नवदुर्गेच्या आगमनावेळी भाविकांत जल्लोषात पहायला मिळाला. पुढील नऊ दिवस इथे उत्साहाच वातावरण असणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले नवरात्र उत्सव मंडळ म्हणून ओळखले जाणारे बाजारपेठ नवरात्र उत्सव मित्रमंडळाच्या नवदुर्गेचे आगमन बुधवारी रात्री उशिरा झाले. वाजत गाजत आगमन मिरवणूक काढण्यात आली होती. यंदा उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी दीपक बाबाजी केसरकर तसेच खजिनदार शैलेश मेस्त्री, सेक्रेटरी दिलीप राऊळ, ईनास माडतीस यांची निवड करण्यात आली आहे. मंडळाचे हे ३४ वे वर्ष असून नवसाला पावणारी दुर्गामाता अशी या देवीची ओळख आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. भजन स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, रेकॉर्ड डान्ससह विविध कार्यक्रमांची रेलचेल इथे नवरात्रीत असणार आहे. कुंकुमार्चन व इतर सर्व धार्मिक कार्यक्रमांसाठी पुरोहित बाळू कशाळीकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तर कार्यक्रमासाठी संपर्क शैलेश मेस्त्री 7498348044 यांच्याशी साधावा असे आवाहन मंडळाने केलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles