मुलींच्या बाबतीत पालकांनी सजग राहून काळजी घ्यावी! : पीएसआय माधुरी मुळीक यांचा मौलिक सल्ला. ; सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा सन्मानसोहळा उत्साहात संपन्न.!

सावंतवाडी : आज आपण जागतिक स्तरावर महिला दिन साजरा करत आहोत, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. मात्र असे असले तरी आजही महिला सुरक्षित का नाहीत?, याचा सारासार विचार करणे गरजेचे आहे. अनेकदा महिला असुरक्षित असल्याची भावना आपण सहज व्यक्त करतो आणि पुरुषांना याबाबतीत गुन्हेगार ठरवतो, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे.  खऱ्या अर्थाने स्त्री आणि पुरुष ही रथाची दोन चाक आहेत. ही समसमान चालली तरच आदर्श समाजाची निर्मिती होते, हा इतिहास आहे. राम – सीता यांना आपण का पूजतो?,  तसेच शिवपार्वती यांची देखील आपण उपासना करतो.  कारण इतिहासातही आपली स्त्री – पुरुष समानता अधोरेखित झाली आहे. मात्र अलीकडे मुलींवर अत्याचारांचे प्रमाण वाढते आहे.  याचे कारण केवळ पुरुषप्रधान संस्कृती नाही तर अनेक पालकांचे आपल्या मुलींकडे लक्ष नाही, अशी भावनिक खंत सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी व्यक्त केलली.

सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने आयोजित नारीशक्ती सन्मान या महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमात माधुरी मुळीक मार्गदर्शन करत होत्या.

दरम्यान पीएसआय माधुरी मुळीक पुढे म्हणाल्या की, रात्री – अपरात्री सावंतवाडीसारख्या अगदी लहान शहरामध्ये मोती तलावाच्या काठावर अगदी तोकड्या कपड्यात काही युवती आम्हाला दिसून येतात. खऱ्या अर्थाने ही अत्यंत चुकीची बाब असून संबंधित तरुणींच्या पालकांनी याबाबत सजग असले  पाहिजे. खरंतर  अनेकदा महिलांच्या बाबतीत काही वाईट घटना घडली तर पुरुष व्यक्तीला प्रत्येक ठिकाणी जबाबदार ठरविले जाते किंवा गुन्हेगार देखील ठरवले जाते. मात्र ही बाब देखील तेवढीच चुकीची आहे. रात्री – अपरात्री आमच्या मुली कुठे फिरतात?,  कोणासोबत फिरतात आणि कशा कपड्यांवर फिरतात?, हे प्रत्येक पालकांनी तपासले तर नक्कीच याची उत्तरे  मिळतील.  असे सांगून त्यांनी अलीकडच्या गुन्हेगारीबाबत आणि त्याला जबाबदार असलेल्या समाजाबद्दल अत्यंत चिंतनशील आणि प्रबोधनशील विचार मांडले.  यावेळी त्यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल सावी पाटील यादेखील उपस्थित होत्या.

सावंतवाडी नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीकडून जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पाककला स्पर्धा, स्वसंरक्षण मार्गदर्शन, फनी गेम्स आदींसह विविध उपक्रम राबविण्यात आले‌. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.‌ येथील बॅ. नाथ पै सभागृहात नारीशक्तीचा जाग करण्यात आला.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खास महिलांसाठी व नगरपरिषद मधील महिला कर्मचाऱ्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस उप निरीक्षक माधुरी मुळीक, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, उपसभापती सुनिता पेडणेकर, सभापती आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, मोहिनी मडगावकर, नगरसेवक अजय गोंदावळे, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, निलम नाईक, ॲड‌. सायली दुभाषी, पोलीस कॉन्स्टेबल सावी पाटील आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महिला दिनाचे औचित्य साधून पाककला स्पर्धा, स्वसंरक्षण मार्गदर्शन, फनी गेम्स आदींसह विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी अनंत चिंचकर, कबीर हेरेकर, समृद्धी गावडे, जीया शेख, जीयाद शेख, प्रज्ञा मोंडकर, तृप्ती राऊळ, नेहा बांदेकर, स्तुती गुरव, अनुराधा महाजन, हर्षा देऊलकर, गोकुळी बुवा, सुप्रिया गावडे, अनिशा राणे, सुमीधा नाईक, प्रतिभा चितारी, विजय सुकी, अकीलाबाणु पटेल, नुपूर मठकर, महिला पत्रकार जुईली पांगम व अनुजा कुडतरकर, प्रज्ञा पांचाळ, निधी खडपकर, साक्षी रामदूरकर, सपना म्हापसेकर, वेणू सावंत आदींचा विशेष सन्मान करण्यात आला.‌

तसेच सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला कर्मचारी प्राची पाटील, प्राजक्ता कांबळे, आसावरी केळबाईकर, माधवी म्हापसेकर, परवीन शेख, नेहा आडेलकर, सोमिया चव्हाण, रेश्मा मेहतर, अनिता होडावडेकर, सपना जाधव, सुकन्या कुलकर्णी, शितल वाळके, लीना राणे, शमिका नेमळेकर, संजीवनी शिरसाट, गौरवी कुडाळकर, गौरी नाईक, रजनी शिंदे, प्रज्ञा काणेकर, भारती लाखे, गीता बरागडे, संगीता कदम, जया कदम, दशमी लाड, जया कदम, आशा बरागडे, संगीता कदम, अनुष्का सनम, गौतमी तेंडोलकर, रिया झोरे, अंजली वेंगुर्लेकर, गीता जाधव, निता कुडतरकर, सुगंधा चोडणकर, मिनाक्षी पवार, लक्ष्मी कांबळे आदींसह नगरपरिषदेच्या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यानिमित्ताने महिलांसाठी फनी गेम्सच देखील आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रूपेश पाटील यांनी केलं. प्रास्ताविक महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर तर आभार उपसभापती सुनिता पेडणेकर यांनी मानले.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles