सावंतवाडी : उत्कृष्ट महिला व्यवसायिका म्हणून शासनाच्या उमेद अभियाना अंतर्गत पुरस्कार मिळालेल्या आसोली येथील सौ.रिया धुरी हिचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष सौ अर्चना घारे परब यांच्याकडून सत्कार करण्यात आला.
वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील झेप प्रभाग संघाच्या सचिव पदी काम करीत असताना शासनाच्या उमेद अभियाना अंतर्गत परिसरातील 3 हजार महिलांच्या हाताला सौ रिया धुरी काम दिले आहे वेंगुर्ला तालुक्यातील सुरंगीच्या उत्पादनाला त्यांनी थेट वाशीला मार्केट निर्माण करून दिले आहे पूर्वी या ठिकाणी शेतकरी व्यापाऱ्याला आपले उत्पादन देत होते परंतु सौ.धुरी हीने या उत्पादनाला थेट बाजारपेठ मिळवून देत शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून दिले आहे एकूणच बचत गटांसाठी त्यांचे सुरू असलेले काम आणि व्यवसाय म्हणून त्याने टाकलेले पाऊल लक्षात घेता शासनाच्या उमेद अभियाना अंतर्गत त्यांचा नुकताच वेंगुर्ला साई दरबार हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
एक महिला व्यावसायिका म्हणून सौ धुरी हिने केलेले काम आणि कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या कामाची पोचपावती म्हणजेच त्याना मिळालेला हा पुरस्कार असल्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सौ अर्चना घारे परब म्हणाले. या पुरस्काराबद्दल त्यांनी सौ.धुरी हीचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. व्यवसायात पुढे येणाऱ्या महिलांनी सौ.धुरी हिचा आदर्श घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आसोली येथील उत्कृष्ठ महिला व्यवसायिका रिया धुरी हिचा अर्चना घारेकंडून सत्कार.! ; ‘उमेद’कडून सौ. धुरी यांचा पुरस्काराने झाला गौरव.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


