वेंगुर्ला : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण महिला अध्यक्ष सौ. अर्चना घारे – परब यांनी नुकत्याच निवती समुद्र किनारी बोट पलटी होऊन घडलेल्या दुर्घटनेत मृत पावलेल्या श्रीरामवाडी येथील आनंद पराडकर, तसेच खवणे येथील भाऊ येरागी यांच्या घरी भेट दिली. दोन्ही कुटुंबाच्या सदस्यांची त्यांनी यावेळी भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केली. यावेळी त्यांनी दोन्ही परिवारांना दुःखद प्रसंगी स्वतःला सावरावे. घडलेल्या अतिशय कठीण प्रसंगात आपण आपल्या समवेत आहोत सांगितले.
तसेच निवती समुद्र किनारी ज्यांची बोट पलटी झाली ते बोट मालक आनंद धुरी यांच्या घरी जाऊन दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली व शासन स्तरावर झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी अधिकारी यांना माहिती दिली.
यावेळी निवती सरपंच श्री. अवधूत रेगे , पोलीस पाटील जोगेश सारंग , गोविंद जाधव, परेश सारंग , रामा भगत, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष योगेश कुबल, सावंतवाडी विधान सभा युवक अध्यक्ष विवेक गवस तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.