मुंबईचा सलग तिसरा पराभव! ; आरसीबीचा वानखेडेत १८ धावांनी विजय.

मुंबई : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात रविवारी 12 एप्रिल रोजी डबल हेडरचा थरार रंगला. डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. त्यानंतर दिवसातील दुसऱ्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने होम टीम मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी धुव्वा उडवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 241 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र आरसीबीच्या गोलंदाजांसमोर मुंबईला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 222 धावांपर्यंतच पोहचता आलं. आरसीबीचा हा 4 सामन्यांमधील तिसरा विजय ठरला. तर मुंबईचा हा सलग आणि तिसरा सामना पराभव ठरला.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles