४८ तासात सापडले मुंडकी छाटलेले ४ मृतदेह! ; रहस्यमयी मृत्यूंमुळे ‘या’ जिल्ह्यात उडाली प्रचंड खळबळ.

कैमूर : शहरात किंवा गावात एखादा जरी मृतदेह सापडला तरी, सर्वत्र खळबळ माजते. पण या गावात तर, ४८ तासांत तब्बल ४ धड नसलेले मृतदेह आढळले आहे. शिवाय शारीराचे अवयव सर्वत्र विखुरलेले होते. सतत घडत असलेल्या या घडनांमुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ४८ तासांत आधी दोन धड नसलेले मृतदेह आढळले, त्यानंतर पुन्हा २ धड नसलेले मृतदेह आढळले. शिवाय शरीराचे अवयव देखील वेगवेगळ्या भागात असल्याचं आढळलं आहे. ज्यामुळे पोलिसांची चिंता अधिक वाढली आहे. आतापर्यंत पोलिसांनी चार अज्ञात शव जप्त केले आहेत, पण एकाची देखील ओळख पटलेली नाही. या धक्कादायक घटना बिहार येथील कैमूर जिल्ह्यातील रामगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा, रामगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आभैदे गावाजवळ एका पोत्यात एक मृतदेह आणि शरीराचे छिन्नविछिन्न अवयव सापडल्याने पोलिसांना देखील मोठा धक्का बसला. माहिती मिळताच, कैमूरचे एसपी हरिमोहन शुक्ला, मोहनियाचे एसडीपीओ प्रदीप कुमार यांच्यासोबत पोलिसांचं मोठं पथक घटनास्थळी दाखल झालं. घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी सुरु केली असून. पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. असं सांगण्यात येत आहे की, गेल्या दोन दिवसांत, रामगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार धड नसलेले मृतदेह आणि शरीराचे विविध अवयव सापडले आहेत.

मृतदेहांची अवस्था इतकी वाईट आहे की, त्यांची ओळख पटवणं पोलिसांसमोर एक मोठं आव्हान बनलं आहे. मृतदेह सापडण्याच्या सततच्या घटनांमुळे, रामगड पोलीस ठाण्याच्या परिसरात आणि आजूबाजूच्या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जवळच्या जिल्ह्यांमध्ये आणि पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवलेल्या बेपत्ता व्यक्तींच्या प्रकरणांची पोलीस जुळवाजुळव करत आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास केला जात आहे.

एसडीपीओ प्रदीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० मे रोजी रामगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्गावती नदीतून दोन अज्ञात मृतदेहांचे अवयव सापडले. अभैदे गावाजवळ कर्मनाशा नदीच्या काठावरही मृतदेहांचे अवयव आढळले आहेत. पोलीस या प्रकरणांचा एकमेकांशी संबंध असल्याच्या दृष्टीने पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी असं देखील सांगितलं आहे की, आतापर्यंत कोणतीच बॉडी पूर्णपणे ताब्यात आलेली नाही. सुरुवातीच्या तपासात असं कळून आलं आहे की, एक पुरुष, एक महिला आणि एका चिमुकल्याचा मृतदेह असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर चौथ्या मृतदेहाची ओळख अद्यापही पटलेली नाही. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर घटनेबद्दल माहिती मिळू शकेल. प्रदीप कुमार यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, कोणाला कोणतीही माहिती मिळाल्यास पोलिसांना कळविण्यात यावं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles