राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नील बांदेकर अव्वल!

सावंतवाडी : सम्यक मित्र मंडळ, बांदा आयोजित 135 व्या आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या खुल्या वक्तृत्व स्पर्धेत जवाहर नवोदय विद्यालय सांगेली, सिंधुदुर्गचा इयत्ता आठवीत शिकणारा विद्यार्थी कु. नील नितीन बांदेकर याने माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. .स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक अरुण सुतार सर यांनी केले.
नीलला बांदा गावचे उपसरपंच आणि चार्टर अकाउंट श्री. रत्नाकर आगलावे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेसाठी नीलला त्याची आई सौ.गौरी बांदेकर आणि वडील नितीन बांदेकर यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.
आतापर्यंत वक्तृत्व कथाकथन, वेशभूषा, गीत गायन,चित्रकला, मॉडेलिंग, हस्ताक्षर यासारख्या अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन नीलने 500 हून अधिक बक्षिसे पटकावली आहेत.
विविध स्तरावरून नीलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles