जिल्हास्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत पूर्वा मेस्त्री, स्वरा पावसकर ठरल्या अव्वल. ; महादेवाचे केरवडे येथे रंगला नृत्याचा जल्लोष!

कुडाळ :  तालुक्यातील महादेवाचे केरवडे येथे श्री सिद्ध महादेव मंदिर यात्रेनिमित्त शिवतेज ग्रुपतर्फे जिल्हास्तरीय भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले होते त्यात मोठ्या गटात पूर्वा मेस्त्री आणि लहान गटात स्वरा पावसकर यांचा प्रथम क्रमांक आला.
ही स्पर्धा सोमवार, दि. १८ मे २०२६ रोजी रात्री श्री सिद्ध महादेव मंदिर परिसरात पार पडली. उदघाट्न प्रसंगी प्रशांत मेस्त्री, जी के सावंत, भाऊ कविटकर, प्रकाश मोर्ये, मोहन सावंत, राजा धुरी, राजू कविटकर, देव्यानी खरात, अर्चना घावनळकर, प्राची परब, पंढरीनाथ परब, प्रमोद गोठोस्कर, सतिश केरवडेकर, मधुकर परब, पिंटू उभारे, गुरु पंदारे, ज्ञानेश्वर राणे, आबा चिपकर आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत दोन गट ठेवण्यात आले होते. एक खुला गट आणि दुसरा १२ वर्षांखालील लहान गट. याचा निकाल खालीलप्रमाणे आहे.
खुला गट प्रथम क्रमांक पूर्वा मेस्त्री, द्वितीय क्रमांक वैष्णवी बोडके, तृतीय क्रमांक नंदिनी बिले यांनी प्राप्त केला तर लहान गटात स्वरा पावसकर, द्वितीय क्रमांक काव्या मांजरेकर, तृतीय क्रमांक प्राप्त केला. खुल्या गटातील विजेत्यांना अनुक्रमे संजय भाऊ कविटकर यांच्या सौजन्याने ₹५०००, रामभाऊ धुरी यांच्या सौजन्याने ₹३००० आणि नारायण केसरकर यांच्यातर्फे ₹२००० रोख पारितोषिकांसह ट्रॉफी देण्यात आली. तसेच लहान गटासाठी कै विष्णू मेस्त्री व लक्ष्मी मेस्त्री यांच्या स्मरणार्थ प्रशांत यशवंत मेस्त्री यांच्यामार्फत ₹३०००, ₹२००० आणि ₹१००० अशी बक्षिसे विजेत्या स्पर्धेकांना देण्यात आली. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली. लहान गटासाठी प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीला श्रीकृष्ण सुभाष लाड, द्वितीय क्रमांक ट्रॉफीला संतोष तवटे, तृतीय क्रमांकाला दया आंबावले यांनी सौजन्य केले तर मोठ्या गटातील सर्व ट्रॉफ्या कै सोनू आंबावले यांच्या स्मरणार्थ दया आंबावले यांनी सौजन्य केल्या.
स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये पार पडली. स्पर्धेचे परीक्षण नृत्य कौशल्य, ताल-समन्वय, सर्जनशीलता, वेशभूषा व सादरीकरण आणि एकूण प्रभाव या निकषांवर करण्यात आले.
या स्पर्धेमुळे स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी मोठा मंच उपलब्ध झाला. परिसरात नृत्याचा जल्लोष अनुभवायला मिळाला.
या स्पर्धेचे परीक्षण समिल नाईक, नागेश नाईक, हेमलता जाधव, भाग्यश्री वाडकर यांनी केलं. या स्पर्धेसाठी शिवतेज ग्रुपचे अध्यक्ष वासुदेव मेस्त्री, सचिव दया आंबावले,  खजिनदार विशाल परब, संदेश गोसावी, प्रसाद पेडणेकर, किशोर मेस्त्री, सुहास सावंत, गणेश नाईक, सचिन शिंदे यांनी परिश्रम घेतले. सर्व स्पर्धकांचे मंडळाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles