सावंतवाडी : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज सावंतवाडीत आले असता त्यांचे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी स्वागत केले. यावेळी श्री. सरनाईक यांनी सावंतवाडी बस स्थानकाची देखील पाहणी केली. २० नव्या गाड्या सावंतवाडीला देणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.
मंत्री श्री. सरनाईक यांचे आ. दीपक केसरकर यांनी स्वागत केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, सावंतवाडी तालुकाप्रमुख दिनेश गावडे, बबन राणे, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, शशिकांत गावडे, विनायक म्हाडेश्वर, सावंतवाडीतील शिवसेनेचे नगरसेवक, नगरसेविका आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



