सावंतवाडी रेल्वे स्थानकाला लोकमान्य मधु दंडवते असे नाव दिल्याबद्दल आ. केसरकरांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार!

मुंबई / सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे स्थानकाला माजी खासदार स्व. मधु दंडवते यांच्या स्मृती आणि योगदानाबद्दल लोकमान्य मधु दंडवते असे नाव देण्यात आले आहे . त्याबद्दल स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानले आहेत. याबाबतचे आभार पत्र मुख्यमंत्र्यांना सादर करून सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

आ. केसरकर यांनी स्व. दंडवते यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला आहे. रेल्वे प्रकल्पासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून कोकण रेल्वेच्या उभारणीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या कार्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली असून त्यांची आठवण जपण्यासाठी सावंतवाडी रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव देणे उचित ठरेल, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

स्व. मधु दंडवते हे सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेले लोकनेते होते. त्यांच्या कार्याचा गौरव होण्यासाठी आणि भावी पिढीसमोर त्यांचे योगदान अधोरेखित करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असेही आभार पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles