स्मार्ट मीटरच्या वाढत्या तक्रारींवर सिंधुदुर्गात वीज ग्राहक संघटना आक्रमक! ; ओरोस येथे उद्या तातडीची सभा, ग्राहकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अध्यक्ष संजय लाड यांचे आवाहन.

ओरोस : स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेमुळे वीज ग्राहकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम, वाढीव वीज बिलांबाबतच्या तक्रारी आणि सोशल मीडियावर फिरत असलेल्या विविध नोटिसांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी उद्या सोमवार, 15 जून रोजी दुपारी 3 वाजता श्री देव रवळनाथ मंदिर, ओरोस येथे तातडीची सभा आयोजित करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून स्मार्ट मीटर संदर्भातील विविध संदेश आणि नोटिसा सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ होत असल्याच्या तक्रारीदेखील मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्राहकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि पुढील भूमिका निश्चित करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
सभेमध्ये सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या स्मार्ट मीटर जोडणी संदर्भातील नोटिसा, स्मार्ट मीटरमुळे वाढीव बिलांचा प्रश्न तसेच ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या इतर विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व वीज ग्राहकांनी या सभेला उपस्थित राहून आपली भूमिका मांडावी, असे आवाहन अध्यक्ष संजय लाड यांनी केले आहे
ही सभा वीज ग्राहकांच्या हक्कांसाठी महत्त्वाची ठरणार असून स्मार्ट मीटरच्या प्रश्नावर जिल्ह्यातील ग्राहकांची एकत्रित भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles