भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा दणदणीत निकाल! ; ९६.१७% यशासह इलेक्ट्रिकल विभागाची शंभर टक्के कामगिरी!, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या पदविका अभियांत्रिकी परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या उन्हाळी 2026 परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) ने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. संस्थेतील 261 पैकी 251 विद्यार्थी उत्तीर्ण होत 96.17% निकालाची नोंद झाली आहे.

यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाने 100% निकालाची अभिमानास्पद कामगिरी केली असून विभागातील सर्व 49 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागात पारस गंगाराम मेस्त्री (91.28%) प्रथम, नमिता सुभाष मोरजकर (88.17%) द्वितीय तर जयराम रघुनाथ सापळे (87.78%) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचा निकाल 98.13 टक्के लागला असून 55 पैकी 54 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विभागात साहिल विनोद देसाई (88.39%) प्रथम, मकरंद भारमानी तिरवीर (87.11%) द्वितीय आणि प्रथमेश गोपाळ कणेरकर (85.17%) तृतीय क्रमांकाने यशस्वी झाले.

कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागात 131 पैकी 124 विद्यार्थी उत्तीर्ण होत 94.65 टक्के निकाल लागला आहे. विभागातील विधी विक्रम कोटणीस (94.24%) प्रथम, मैथिली सतीश पाथरूट (92 %) द्वितीय तर उर्वी विजय आंदुर्लेकर, निशांत नारायण जाधव आणि नंदिनी संजीवकुमार सिंग (91.47%), यांनी संयुक्त तृतीय क्रमांक मिळविला. सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचा निकाल 92.30 टक्के लागला असून 26 पैकी 24 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागात तनिष्का गुरुदास गवस (86.61%) प्रथम, आयुष विशाल नार्वेकर (86.50%) द्वितीय आणि औधव विलास भिके (86.00%) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, प्राचार्य डॉ. रमण बाणे व उपप्राचार्य गजानन भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले. पदविका अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्टतेची परंपरा कायम राखत यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेची वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचा विश्वास उपप्राचार्य गजानन भोसले यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles