Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

राजन तेलींच्या पाठपुराव्यामुळे सावंतवाडी मतदार संघात २७ कोटींचे रस्ते ; मतदार संघातील १७ रस्त्यांचा समावेश, मुख्यमंत्री ग्रामसडकमधून निधी.

सावंतवाडी : माजी आमदार राजन तेली यांच्या प्रयत्नातून सावंतवाडी मतदार संघातील १७ रस्त्यांना तब्बल २७ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. याबाबत तेली यांनी पाठपुरावा केल्यानंतर ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे श्री. तेली यांनी महाजन यांचे आभार मानले आहेत.

या रस्त्यात सांगेली-घोलेवाडी-सावरवाड रस्त्यासाठी २ कोटी, आंबेगाव-रुपनवाडी रस्त्यासाठी अडीच कोटी, इन्सुली-गावठण शिवाजी चौक ते गावडेवाडी-चर्मकारवाडी-कोनवाडा रस्त्यासाठी १ कोटी ७५ लाख, आरोंदा सुभेदारवाडी-सावरजुवा रस्त्यासाठी १ कोटी ७५ लाख, सावंतवाडी-कोलगाव-चव्हाटा-डोंगरवाडी ९० लाख, सावंतवाडी तळवणे मुख्य रस्ता ते जंजीर हरीजनवाडी रस्त्यासाठी १ कोटी ७५ लाख, सावंतवाडी मळेवाड पोस्ट ते मुसळेश्वर मंदिर रस्त्यासाठी २५ कोटी, दोडामार्ग-कळणे-उगाडे मुख्य रस्ता ते कोनाळ रस्त्यासाठी १ कोटी ७५ लाख, दोडामार्ग मणेरी-तळेवाडी ते धनगरवाडी रस्त्यासाठी अडीच कोटी, वेंगुर्ला रेडी-गावतळे गोळतू रस्त्यासाठी २ कोटी, वेंगुर्ला आडेली-वजराठ पिंपळाचे भरड रस्त्यासाठी २ कोटी ८० लाख, वेंगुर्ला मातोंड सावंतवाडा ते नेवाळे रस्त्यासाठी १ कोटी ३ लाख, वेंगुर्ला रेडी विठोबा मंदिर ते सिद्धेश्वर मंदीर रस्त्यासाठी १ कोटी ३० लाख, वेंगुर्ला पेंडूर चिरेखण दळवीवाडी, नाईकवाडी,न्हावेली रस्त्यासाठी २ कोटी ८८ लाख, वेंगुर्ला प्रजिमा ५६ ते पेंडूर सातवायंगणी ते पेंडूर रस्ता मजबुतीकरणसाठी ९० लाख चा निधी मंजूर करण्यात आला आहे

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles