Wednesday, June 18, 2025

Buy now

spot_img

डेगवे येथे माजी आम. राजन तेलींचा विशेष सन्मान.! ; श्री महालक्ष्मी स्थापेश्वर मंदीर परिसराच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न.

सावंतवाडी : तालुक्यातील डेगवे येथील ४८ गावांचा अधिपती श्री महालक्ष्मी स्थापेश्वर मंदीर या ठिकाणी अन्नछत्र इमारत , स्वच्छतागृह आणि मंदिर परिसराचे सुशोभिकरण करणे या कामाचे भूमिपूजन सोहळा माजी आमदार राजन तेली यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी दिलेला शब्द पाळला आणि अत्यंत कमी वेळात आपल्या ओळखीचा चांगला वापर करून या ४८ गावांच्या देवस्थानातील प्रादेशिक पर्यटनमधून ३ कोटी रूपये मंजूर करून घेतले यासाठी ४८ गावचे मानकरी, ग्रामस्थ यांनी राजन तेली यांचे आभार व्यक्त केले आणि पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले.

यावेळी माजी आमदार व सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांच्या समवेत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, प्रमोद कामत, दादू कविटकर , प्रेमानंद देसाई,अभिलाष देसाई, सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, सीताराम देसाई, मधुकर देसाई , भगवान् देसाई, राजन देसाई, प्रविण देसाई, विलास गवस , प्रेमानंद गवस, सतीश गवस, रमेश परब , चंद्रशेखर देसाई, मंगेश देसाई, नवनित देसाई , शरद सावंत , सुभाष देसाई, सूर्याजी देसाई, मंगेश देसाई आदी मानकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles