वर्षाभरापूर्वीच लग्न….पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून पतीने संपवलं जीवन.

मालेगाव : पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केली, अशा घटना आपण कायमच ऐकतो. बहुतेक आपल्या शेजारी आपल्या कॉलनीत अशाप्रकारच्या घटना घडतात. मात्र, पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या केली, अशा घटना फार कमी ऐकायला मिळतात. नुकताच नाशिकच्या मालेगावात धक्कादायक घटना घडली. पत्नीच्या जाचाला कंटाळून चक्क पतीने आपली जीवनयात्रा संपवली. नाशिकच्या मालेगावर कॅम्प भागात साने गुरूजी नगरमधील रहिवासी अनिकेत बाळासाहेब जगताप (वय 27) याने चक्के पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणात कॅम्प पोलिसांनी पत्नीसोबतच सासू सासरे आणि मामे सासू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. अनिकेत याचे वडील बाळासाहेब जगताप यांनी पोलिसांना तक्रार देत अनिकेत याचा मानसिक छळ पत्नी श्रुती जगताप, सासू वंदना धिवरे, सासरे सुभाष धिवरे आणि मामे सासू यांनी केल्याचा आरोप केला.

या प्रकरणात त्यांनी लेखी तक्रारही दिली. या सर्वांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अनिकेत आणि श्रुती यांचे लग्न वर्षभरापूर्वीच झाले. मात्र, लग्न झाल्यापासून दोघांमध्ये सतत वाद होत होते. वाद इतके वाढले की, दोघेसोबतही राहत नव्हते. श्रुती आपल्या माहेरी निघून गेली. हेच नाही तर तिने थेट अनिकेत याच्याविरोधात पोलिसात तक्रारही केली. ज्याने गेल्या काही महिन्यांपासून अनिकेत हा मानसिक तणावात होता.

शेवटी त्याने याच मानसिक तणावात आपले आयुष्य संपवले. पत्नी, सासू सासरे आणि मामे सासू यांच्या जाचाला कंटाळून अनिकेत याने गळफास घेत आयुष्याचा शेवट केला. पोलिसांनी सुरूवातीला अनिकेत याच्या आत्महत्येनंतर आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, त्यानंतर अनिकेतच्या वडिलांनी गंभीर आरोप करत लेखी तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली. ज्यानंतर पोलिसांनी पत्नी, सासू सासरे आणि मामे सासू विरोधात गुन्हा दाखल केला. या सर्वांना अटक करण्याच्या मागणीसाठी जगताप कुटुंब आक्रमक झाले. अवघ्या 27 वर्षाच्या लेकाने सासरच्या लोकांच्या कंटाळून आत्महत्येसारखे पाऊस उचलल्याने थेट खळबळ उडाली. नातेवाईकही आक्रमक होताना दिसले. आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles