स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे हार्मोनियम परीक्षेत सुयश !

सावंतवाडी : स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या हार्मोनियम परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. प्रारंभिक परीक्षेत इयत्ता ४ थी तील कु. वल्लभ राऊळ, इमत्ता ५ वी तील कु. खुश भाईडकर आणि इयत्ता ७ वी तील कु. गौरिश परब यांनी प्रथम श्रेणी प्राप्त करून संस्थेचा गौरव वाढविला. तसेच प्रवेशिका प्रथम परीक्षेत इयत्ता ७ वी तील कु. ऋतुजा पेडणेकर हिने प्रथम श्रेणी मिळवत उत्कृष्ट कामगिरी दर्शविली.

या विद्यार्थ्यांना प्रशालेचे हार्मोनियम शिक्षक श्री. कपिल कांबळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संचालक रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच परीक्षेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक व सांगितीक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles