वीज ग्राहकांचा एल्गार!, भरमसाठ वीजबिल, स्मार्ट मीटर आणि खंडित वीजपुरवठ्याविरोधात उद्या दोडामार्गात ठिय्या आंदोलन! ; सर्व ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे वीज ग्राहक संघटनेचे आवाहन.

दोडामार्ग : तालुक्यातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग यांच्या वतीने सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता महावितरण (MSEB) कार्यालय, दोडामार्ग येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
रोजचा खंडित होणारा वीजपुरवठा, ग्राहकांना येणारी भरमसाठ वीजबिले, स्मार्ट मीटरची सक्ती, वायरमनची कमतरता, ग्राहकांना वेळेवर वीजबिले न मिळणे तसेच स्मार्ट मीटरमधील बिल भरण्याची मुदत संपताच आपोआप वीजपुरवठा खंडित करणारी प्रणाली रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात येत आहे.

या आहेत मुख्य मागण्या
रोज होणारा खंडित वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा.
ग्राहकांना आलेली भरमसाठ वीजबिले रद्द करून योग्य दुरुस्ती करावी.
स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबवावी.
दोडामार्ग तालुक्यात वायरमनची रिक्त पदे तातडीने भरावीत.
सर्व ग्राहकांना वेळेवर वीजबिले उपलब्ध करून द्यावीत.
स्मार्ट मीटरमध्ये बिलाची मुदत संपल्यानंतर आपोआप वीजपुरवठा खंडित करणारी प्रणाली (चिप) काढून टाकावी.
या आंदोलनात सर्व वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली गाऱ्हाणी प्रशासनापुढे मांडावीत, असे आवाहन वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष सुभाष दळवी, सचिव भूषण सावंत तसेच व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सागर शिरसाट यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles