Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

‘लाडकी बहीण’च्या भरघोस यशानंतर आता ‘लाडकी गृहसेविका योजना’, घरकाम करणाऱ्या महिलांना १० हजारांचा लाभ?

मुंबई : राज्य सरकारनं अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली. या योजनेच्या घोषणेनंतर राज्यभरातून महिलांनी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गर्दी केली. मध्य प्रदेशच्या लाडली बहना योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे. यानंतर आता असंघटित क्षेत्रातील मोलकरणींसाठी देखील सरकार लवकरच एक गृहोपयोगी साहित्य वाटपासंदर्भातील योजनेवर काम करत आहे. लोकसत्तानं यासंदर्भात माहिती दिली. तसेच, राज्यात तब्बल 10 ते 12 लाख घरगुती कामगार- मोलकरणींची संख्या असल्याची माहिती सरकारच्याच वतीनं जाहीर करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या या योजनेंतर्गत स्वयंपाक घरातील कुकरसह 21 भांड्यांचा सुमारे 10 हजार रुपये किमतीचा संच घरगुती कामगार महिलांना देण्याची तरतूद केली जाणार आहे. अशा संचांचं वाटप होणार असल्याची अफवा छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांत पसरल्यानंतर एकच गर्दी उसळल्याचं पाहायला मिळालं. मात्र, संचवाटप केवळ नोंदणीधारक घरगुती मोलकरणींनाच होणार असल्याची माहिती मिळताच गर्दी ओसरली. त्यानंतर मोलकरीण म्हणून अधिकृत नोंदणी करण्यासाठी महिलांची धावपळ सुरू झाली.

एका वृत्तपत्राला माहिती देताना एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठीची भोजन योजना आणि कामावरील साहित्य संचवाटपाच्या धर्तीवरच नोंदणीकृत घरेलू कामगार, मोलकरणींसाठी 10 हजार रुपये किमतीची भांडी-कुंडी, कुकर आदी साहित्याचा संच देण्यात येणार आहे.

दरम्यान, दिवंगत आर. आर. पाटील उपमुख्यमंत्री असतानाच 10 लाख घरेलु कामगारांची संख्या असल्याची माहिती विधिमंडळात देण्यात आली होती. त्यावर तत्कालीन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनीही शिक्कामोर्तब केलं होतं. आता 12 ते 13 लाख घरेलू कामगार असून, त्यांत 99 टक्के महिला आहेत. मात्र त्यात नोंदणीकृत किती हा प्रश्नच आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles