सावंतवाडी : येथील राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित ‘आविष्कार’ या भित्तिपत्रिकेसारख्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या साहित्यिक, चित्रकला आणि सर्जनशील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी एक सुंदर व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन ‘शिक्षण सप्ताह’ दिनाचे औचित्य साधून ‘आविष्कार’ या भित्तिपत्रिकेच्या उद्घाटन प्रसंगी जुनिअर कॉलेजचे प्राचार्य जगदीश धोंड यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात केले.
दरम्यान, ज्युनियर कॉलेजच्या उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या विषयांवरती अभ्यासपूर्ण लेखन व कलात्मक सप्तरंगी चित्रांचे रेखाटने उत्कृष्ट पद्धतीने केले. त्यांच्या लेखणीतून व चित्र रेखाटणीतून समाजामध्ये जनजागृतीच्या दृष्टिकोनातून मोलाचा संदेश देऊ शकतो, असे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले व विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर भित्तीपत्रक कमिटीचे प्रमुख डॉ. संजना ओटवणेकर यांनी कमिटीमार्फत खालील विषयांवर अनुक्रमे पर्यावरण संवर्धन व त्याचे महत्त्व, शारीरिक व बौद्धिक खेळांची माहिती व महत्त्व आणि कृषी जीवन या विषयांवरती कथा, कविता, लेख, चित्र इत्यादी लेखन साहित्य मागविण्यात आले. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी लेखन साहित्य व चित्र रेखाटन साहित्य जमा केले. त्यातून निवडक साहित्याला ‘शिक्षण सप्ताह’ दिनाचे औचित्य साधून ‘आविष्कार’ भित्तिपत्रिकेच्या माध्यमातून प्रसिद्ध देण्यात आले असे सांगितले. यासाठी भित्तिपत्रिका कमिटी सदस्य प्रा. संतोष पाथरवट, प्रा. शुभ्रा मोरजकर, प्रा. दिपावली गवस, प्रसिद्धी कमिटी प्रमुख प्रा. रणजीत राऊळ, विद्यार्थी प्रतिनिधी (जी. एस) युवराज भोजविया, विद्यार्थी प्रतिनिधी (एल.आर) पूजा राठोड, ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक व सर्व विद्यार्थी वर्ग प्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले या सर्वांचे आभार मानले.