सिंधुदुर्ग ग्लोबल इंडस्ट्रियल रिजनच्या (SGIR) सर्वसमावेशक विकासासाठी कृती आराखड्याला गती. ; औद्योगिक, पर्यटन व सामाजिक पायाभूत सुविधांवर भर, ; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सादरीकरण.

मुंबई : सिंधुदुर्ग ग्लोबल इंडस्ट्रियल रिजन (SGIR) प्रकल्पाच्या दूरदृष्टी, धोरणात्मक आराखडा आणि अंमलबजावणीच्या कृती आराखड्याबाबत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. बैठकीस सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे दूरदृश्य प्रणालीद्वारे तसेच संबंधित तांत्रिक पथकाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी सिंधुदुर्गच्या सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाला चालना देणारा औद्योगिक परिसर उभारण्यावर भर देण्यात आला. नवीन प्रकल्प विकसित करताना औद्योगिक, सामाजिक आणि संस्थात्मक पायाभूत सुविधांचा समतोल विकास साधत संपूर्ण परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.


सादरीकरणामध्ये उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून बहुआयामी औद्योगिक विकासाला चालना देणे, विद्यमान पायाभूत सुविधांच्या आधारे प्रगत उत्पादन क्षेत्र विकसित करणे तसेच ‘युथ सिटी’ संकल्पनेद्वारे शिक्षण, क्रीडा, पर्यटन आणि आधुनिक सामाजिक व संस्थात्मक पायाभूत सुविधांचा समन्वित विकास साधण्याचा आराखडा मांडण्यात आला. प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया आणि पुढील कार्यवाहीबाबतही माहिती सादर करण्यात आली.
या प्रकल्पाच्या माध्यमातून उद्योग, पर्यटन, शिक्षण आणि आधुनिक पायाभूत सुविधांचा समन्वित विकास साधत सिंधुदुर्गला गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि शाश्वत आर्थिक विकासाचे नवे केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles