सावंतवाडी : जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने दि. २२ व २३ जुलै २०२६ रोजी ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुलात १४, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय ज्यूदो क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत मिलाग्रीस प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत चार सुवर्णपदके पटकावली असून त्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
स्पर्धेतील विजेते विद्यार्थी पुढीलप्रमाणे –
- कु. दुर्गा दिनेश जाधव – १४ वर्षांखालील, -४४ किलो गट – प्रथम क्रमांक
- कु. मयुरी मंगेश जाधव – १७ वर्षांखालील, -४४ किलो गट – प्रथम क्रमांक
- चि. जयेश मंगेश जाधव – १४ वर्षांखालील, -२५ किलो गट – प्रथम क्रमांक
- चि. यश प्रकाश कडाव – १७ वर्षांखालील, ४५ किलो गट – प्रथम क्रमांक
या चारही विद्यार्थ्यांची त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विभागीय (डिव्हिजन) स्तरावरील ज्यूदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे तसेच विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, पर्यवेक्षिका संध्या मुणगेकर, सर्व शिक्षकवृंद आणि पालकांनी त्यांचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



