सावंतवाडी : तालुक्यातील माजगाव येथील ओमकार फूड्स प्रॉडक्ट येथे अज्ञात चोरट्याने सुमारे ५० किलो कोकम चोरी करून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीस गेलेल्या कोकमची किंमत अंदाजे ३० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
याबाबत ओमकार फूड्सचे फिर्यादी शेवडे यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, १५ जुलै २०२६ रोजी रात्री फॅक्टरीच्या छतावर सुकण्यासाठी ठेवलेले कोकम अज्ञात चोरट्याने चोरून नेले.
या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. राऊत हे पुढील तपास करीत आहेत.
घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. हिंगे, पोलीस हवालदार अनिल धुरी, महेश जाधव आणि सुरेश पाटील यांनी भेट देऊन पंचनामा व अन्य आवश्यक कार्यवाही पूर्ण केली.



