सावंतवाडी : महाराष्ट्र राज्यातील B.Pharm (Bachelor of Pharmacy) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, राज्य शासनाच्या State CET Cell व DTE, Mumbai यांच्या माध्यमातून ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे.
या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांची पूर्तता, ऑनलाइन अर्ज भरणे, अर्ज व कागदपत्रांची पडताळणी तसेच पुढील प्रवेशासाठी Option Form भरणे आदी प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. शासनाच्या नियमानुसार ही प्रक्रिया अधिकृत Scrutiny Center मार्फत केली जाते.
📢 प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यासाठी माडखोलमध्ये सुविधा!
फार्मसी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल येथे अधिकृत सुविधा केंद्र (Scrutiny Center क्रमांक – 3490) उपलब्ध आहे.
या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांचे ऑनलाइन प्रवेश फॉर्म भरणे, फॉर्म व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी तसेच Option Form भरणे या प्रक्रिया निःशुल्क करण्यात येतात.
त्यामुळे B.Pharm अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाच्या तारखा व आवश्यक कागदपत्रांची माहिती घेऊन आपल्या नजीकच्या अधिकृत सुविधा केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
📍 अधिकृत Scrutiny Center
व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल
सावंतवाडी–आंबोली स्टेट हायवे लगत,
माडखोल, सावंतवाडी.
Scrutiny Center क्रमांक : 3490
📞 संपर्क : 9763824245 / 9420196031
🎓 B.Pharm मध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी; प्रक्रिया अधिकृत केंद्रावरच पूर्ण करा!
पालक व विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी अधिकृत Scrutiny Center चा लाभ घ्यावा आणि प्रवेशाची संधी दवडू नये.



