कुंभवडे येथे वाघाच्या हल्ल्यात म्हैस ठार! ; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण.

दोडामार्ग : कुंभवडे येथील शेतकरी सिताराम महादेव परब यांच्या म्हशीवर आज सायंकाळी वाघाने हल्ला करून तिला ठार केले. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभाग तळकट, ता. दोडामार्ग येथील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. वाघाच्या हल्ल्यात म्हैस ठार झाल्याने सिताराम परब यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

कुंभवडे, खडपडे आणि फुकेरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाच्या हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत असून, म्हैस ठार होण्याची ही चौथी घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.

वाघाचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांना आपल्या जनावरांची तसेच स्वतःच्या सुरक्षिततेची चिंता सतावत आहे. वनविभागाने या परिसरात वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles