गोवा-मुंबई मार्गावर ८.२२ लाखांचा गुटखा जप्त, संशयिताला सत्र न्यायालयाकडून जामीन. ; ॲड. अशपाक शेख यांचा यशस्वी युक्तिवाद.

ओरोस : गोवा-मुंबई महामार्गावरून बेकायदा गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांना बांदा पोलिसांनी जोरदार दणका दिला आहे. बांदा चेकनाक्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईत मारुती सुझुकी ईको (MH-०७-AS-६४४१) मधून तब्बल ८ लाख २२ हजार ३०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे गोव्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या प्रतिबंधित गुटख्याच्या वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणी आसिफ कादर मेमन (वय ४८, रा. कोलगाव, सावंतवाडी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७१, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बांदा पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत अटक करून न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्याला प्रथम पोलीस कोठडी, तर पुढे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

दरम्यान, संशयिताच्या जामीन अर्जावर ओरोस येथील मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ श्री. एस. टी. त्रिपाठी यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणीअंती न्यायालयाने आसिफ मेमन याची ५० हजार रुपयांच्या जामिनावर काही अटी व शर्तींसह मुक्तता करण्याचा आदेश दिला.

या प्रकरणात बचाव पक्षातर्फे ॲड. अशपाक शेख यांनी मुख्य युक्तिवाद केला. त्यांना ॲड. नामदेव मठकर, ॲड. पंकज खरवडे आणि ॲड. विनय रजपूत यांनी सहकार्य केले.

गुटख्याच्या बेकायदा वाहतुकीवर पोलिसांची कारवाई आणि त्यानंतर संशयिताला मिळालेला न्यायालयीन जामीन यामुळे या प्रकरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles