बांदा नट वाचनालयात २९ ऑगस्ट रोजी कथाकथन स्पर्धेचे आयोजन.

बांदा : येथील नट वाचनालयाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विष्णू नारायण गावकर, आडाळी पुरस्कृत (त्यांच्या पत्नी कै. सौ. विजयालक्ष्मी विष्णू गावकर व सुपुत्र कै. श्री. बिपीन विष्णू गावकर यांच्या स्मरणार्थ) बालवाचक कथाकथन स्पर्धा घेण्यात येणार आहे.
ही स्पर्धा शनिवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता नट वाचनालय, बांदा येथे होणार आहे. स्पर्धा सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यापुरती मर्यादित असून इयत्ता तिसरी-चौथी आणि पाचवी ते सातवी अशा दोन गटांत घेण्यात येणार आहे.
इयत्ता तिसरी व चौथीच्या गटासाठी ‘मला आवडलेली साने गुरुजींची कोणतीही गोष्ट’ हा विषय असून कथाकथनासाठी तीन मिनिटांचा वेळ देण्यात येईल. इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटासाठी ‘पहिली भारतीय महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील एक प्रसंग’ हा विषय देण्यात आला असून यासाठी चार मिनिटांचा वेळ देण्यात येईल.
दोन्ही गटांतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेतून दोन विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे संबंधित शाळांनी २७ ऑगस्ट पर्यंत नट वाचनालयात नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या कथाकथन कौशल्याला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नट वाचनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles