सावंतवाडी : देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सावंतवाडी नगरपरिषद, अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ आणि फिटनेस योग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिमखाना हॉल, सावंतवाडी येथे आयोजित 8 दिवसीय निःशुल्क फिटनेस योग शिबिराचा बुधवार दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी उत्साहात समारोप झाला.
शिबिराच्या आठव्या व सांगता दिनी सकाळी 5:30 वाजता फिटनेस योग परिवाराच्या वतीने योग शिक्षक _श्री. शेखर बांदेकर_ यांना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी फिटनेस युवा अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष नारायण सावंत, फिटनेस योग अकॅडमीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल मेस्त्री, फिटनेस किड्स अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष विशाल लातये, फिटनेस योग प्रचारक सौ. नुपूर पास्ते आणि फिटनेस महिला अकॅडमीच्या जिल्हाध्यक्षा सौ. रसिका सावंत उपस्थित होते.
योगाभ्यासानंतर झालेल्या प्राणायाम सत्रात सर्व योग साधकांनी आपले अनुभव कथन केले, त्यामुळे सत्र अधिक प्रेरणादायी ठरले. या प्रसंगी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिराला दररोज उपस्थिती वाढत गेली आणि सांगता दिवशी विक्रमी उपस्थिती नोंदवली गेली.
सांगता समारंभानिमित्त खाऊचे वाटप करण्यात आले. Online सत्रासाठी तांत्रिक व्यवस्था श्री. नारायण सावंत आणि श्री. काशिनाथ पेडणेकर यांनी पाहिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल लातये यांनी तर आभार प्रदर्शन रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले.



