सावंतवाडी : आपल्या कुंचल्यातून आणि शिल्पकलेतून कोकणच्या कलासंस्कृतीला समृद्ध करणारे प्रसिद्ध मूर्तीकार विलास मांजरेकर यांना प्रतिष्ठेचा ‘कोकण कलारत्न’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
मांजरेकर यांनी आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून मूर्तिकलेच्या क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटविला असून, त्यांच्या कलाप्रवासाची दखल घेत त्यांना मिळालेला ‘कोकण कलारत्न’ सन्मान हा त्यांच्या कलेला मिळालेली पावतीच असल्याचे यावेळी संजू परब यांनी नमूद केले. कलेप्रती असलेली निष्ठा, सर्जनशीलता आणि सातत्यपूर्ण योगदानाचे कौतुक करत परब यांनी मांजरेकर यांच्या पुढील कलावाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगरसेवक गुरुदास मठकर उपस्थित होते. मांजरेकर यांच्या सन्मानामुळे सावंतवाडीच्या कलाक्षेत्राची मान उंचावल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



